मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी २० सामना आज बुधवारी (ता.२८) रंगणार आहे. हा सामना तिरुवनंतपूरम (केरळ) येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. आज कोण बाजी मारणार याकडे लाखो क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
बीसीसीआयने २३ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकाला समोर ठेवून हा दौरा आखला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतासाठी कट्टर स्पर्धक ठरू शकतो. गेल्या काही महिन्यात एकदाही न हरलेल्या आफ्रिकेसमोर खेळताना भारताला पूर्ण शक्ती एकवटून खेळावे लागणार आहे. या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू हार्दिक पंडय़ा यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच मोहम्मद शमीसुद्धा संघात नसेल, यापूर्वीच दुखापतीमुळे रविंद्र जडेजा सुद्धा स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी २० सामना हा केरळ मधील तिरुवनंतपूरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे. सायंकाळी ७ वाजता सामना सुरु होणार आहे. या मालिकेचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. आजचा सामना स्टार स्पोर्ट्सच्या स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी वन आणि स्टार स्पोर्ट्स वन हिंदीवर पाहता येणार आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद अर्शदीप सिंग,
दक्षिण आफ्रिका संघ
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (क), रिले रोसो, तबरेझ शम्सी, एनरिक नॉर्टजे, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा आणि लुइन रोख.