IND vs NZ: मुंबई: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निर्भयपणे फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करत भारताने न्यूझीलंडला 398 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताकडून विराट कोहलीने 117 धावांची तर श्रेयस अय्यरने 105 धावांची शानदार खेळी खेळली. याशिवाय रोहित शर्माने 29 चेंडूत 47 तर शुभमन गिलने 66 चेंडूत 80 धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलंडच्या सर्व गोलंदा गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली. टीम साऊदीने 10 षटकात 100 धावा दिल्या. तर बोल्टने 10 षटकात 86 धावा दिल्या.