पुणे : बीसीसीआयने नुकताच आशिया कपसाठी संघ जाहीर केला. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. तेव्हापासून भारतीय संघाची निवड कधी होणार याची प्रतिक्षा चाहत्यांना होती. आता ही प्रतिक्षा संपली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. निवडलेल्या संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. विराट कोहली आणि केएल राहुलचे पुनरागमन झाले आहे. तर पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहचा संघात समावेश केलेला नाही.
????#TeamIndia squad for Asia Cup 2022 – Rohit Sharma (Capt ), KL Rahul (VC), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, R Pant (wk), Dinesh Karthik (wk), Hardik Pandya, R Jadeja, R Ashwin, Y Chahal, R Bishnoi, Bhuvneshwar Kumar, Arshdeep Singh, Avesh Khan.
— BCCI (@BCCI) August 8, 2022
आशिया कपसाठी भारतीय संघात वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन झाले असले तरी काही युवा खेळाडूंना देखील संधी मिळाली आहे. हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्याने अर्धदीप सिंग आणि आवेश खान यांना संघात स्थान मिळाले आहे. या दोघांकडे आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळवण्याची नामी संधी आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान.