हरारे: झिम्बॉब्वेने भारताला विजयासाठी 116 धावांचे लक्ष्य दिले होते. यष्टीरक्षक फलंदाज क्लाइव्हने संघासाठी नाबाद 29 धावा केल्या. त्याने 25 चेंडूंचा सामना केला आणि 4 चौकार मारले. वेस्लीने २१ धावांचे योगदान दिले. बेनेट 23 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मेयर्सनेही 23 धावा केल्या. कर्णधार सिकंदर रझा १७ धावा करून बाद झाला.
भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. रवी बिश्नोईने 4 षटकात केवळ 13 धावा देत 4 बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने 2 बळी घेतले. त्याने 4 षटकात 11 धावा दिल्या. मुकेश कुमार आणि आवेश खान यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.