पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडेत ११० धावा करून इंग्लंडचा संघ बाद झाला आहे. जसप्रीत बुमराहने डेव्हिड विलीला २१ धावांवर क्लीन बोल्ड करून इंग्लंडचा डाव संपवला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजाली एकामागोमाग एक हादरे दिले. जसप्रीत बुमराहने १९ धावात ६ तर मोहम्मद शमीने ३१ धावात 3 बळी घेत इंग्लंडचा डाव ११० धावांवर संपुष्टात आणला.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या भूमीवर एका सामन्यात सहा विकेट घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे. यापूर्वी, एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध इंग्लंडची सर्वात कमी धावसंख्या 125 धावा होती. 15 ऑक्टोबर 2006 रोजी जयपूरमध्ये त्यांनी हा स्कोअर केला. आता हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघासमोर 111 धावांचे लक्ष्य आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लंडनमध्ये होत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराहने दुसऱ्यांदा वनडेत ६ विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी बुमराहने २०१६ मध्ये पल्लेकेले येथे श्रीलंकेविरुद्ध पाच विकेट घेतल्या होत्या.