दिल्ली : भारताने द आफ्रिकेवर विजय मिळवून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मंगळवारी (ता.११) दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर तिसरा आणि अखेरचा सामना खेळला गेला. या निर्णायक सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 99 धावांवर गुंडाळले.
त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सलामीवीर शुभमन गिलने संयमी 49 धावांची खेळी केली. आणि भारताने हा सामना 7 विकेट्स व 22.5 षटके शिल्लक ठेवून जिंकला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली आहे.