बंगळुरू: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी20 सामना रोमांचक झाला. पहिली सुपर ओव्हरही टाय झाली. सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तान संघाने भारताला विजयासाठी 17 धावांचे आव्हान दिले होते. भारतीय संघ 16 धावा करु शकला. त्यामुळे सुपरओव्हरही टाय झाली.
त्यानंतर दुसरी सुपर ओव्हर झाली. यामध्ये भारत केवळ 11 धावा केल्या अफगाणिस्तानला विजयासाठी 12 धावांचे लक्ष्य दिले. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला केवळ एक धाव करता आली. त्यामुळे भारताने हा सामना 11 धावांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये विजय मिळवला.
बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरु असलेला तिसरा टी 20 सामना टाय झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना चार विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल अफगाणिस्तान संघानेही 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबद्लायत 212 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. या सामन्याचा निकाल आता सुपरओव्हरमध्ये लागला. सुपरओव्हरही टाय झाली. त्यामुळे पुन्हा सुपर ओव्हर होईल.