पुणे : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (२ ऑगस्ट) सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे झाला. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने हा सामना सात गडी राखून जिंकला आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारताकडे २-१ अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वेस्ट इंडीजला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागेल. यजमानांनी प्रथम फलंदाजी करताना पाच गडी गमावून १६४ धावा केल्या. सलामीवीर कायले मेयर्सने ५० चेंडूत ७३ धावा केल्या. त्यामध्ये आठ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.
वेस्ट इंडीजने भारतासमोर ठेवलेल्या १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. मात्र, कर्णधार रोहित शर्माने एक षटकार एक चौकार मारत ५ चेंडूत ११ धावा केल्या. मात्र एक फटका मारताना त्याचा पाठीचा स्नायू दुखावला. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांनी डावाला आकार दिला. दोघांमध्ये ८६ धावांची भागीदारी झाली.
दरम्यान, सूर्यकुमार यादवने ४४ चेंडूत ७६ धावा फटकावल्या. ऋषभ पंतने नाबाद ३३ धावा केल्या आणि १९व्या षटकामध्येच विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने सात विकेट राखून विंडीजला मात देत मालिकेत २-१ अशी अघाडी घेतली.