मुंबई: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात बुधवारी तिसरा T20 सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ बंगळुरूमध्ये पोहचले असून चिन्नास्वामी स्टेडियमवर आमनेसामने येतील. त्याचवेळी हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. भारतीय संघ मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तिसरी टी-20 जिंकून टीम इंडियाला अफगाणिस्तानचा मालिकेत धुव्वा उडवायचा आहे. तर अफगाणिस्तानचा संघ क्लीन स्वीप टाळू इच्छितो. पण या सामन्यासाठी दोन्ही संघांचे प्लेइंग 11 कसे असतील?
टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होऊ शकतो का?
तिसर्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होऊ शकतो, असे मानले जात आहे. आवेश खान आणि कुलदीप यादव यांचा भारताच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते, तर मुकेश कुमारच्या जागी आवेश खानला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. याशिवाय जितेश शर्माच्या जागी संजू सॅमसन मैदानावर दिसणार आहे.
टीम इंडियाची संभाव्य ११-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तानची संभाव्य ११-
रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झदरन (कर्णधार), गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.
भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. अशाप्रकारे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या मालिकेवर आधीच कब्जा केला आहे. पण टीम इंडियाला विजयाने मालिका संपवायला आवडेल.