दीपक खिलारे
इंदापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इंदापूर बार असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत इंदापूर न्यायालयातील वकीलांच्या ‘अ’संघाने विजेतपद पटकावले, अशी माहिती इंदापूर बार असोसिएशनचे सचिव ॲड.आशुतोष भोसले यांनी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन इंदापूर न्यायालयाचे न्यायाधीश पी. ल. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्यायाधीश एस.डी. वडगावकर, न्यायाधीश शीतल साळुंखे, न्यायाधीश जे. बी. खटावकर, इंदापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मनोहर चौधरी, नाझर राजेंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर बोलताना न्यायाधीश पी.ल. पाटील म्हणाले, रोजच्या धावपळीच्या जीवनात आनंद मिळावा याकरिता या क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. तसेच वकील व कर्मचारी यांच्यात मैत्रीपूर्ण नाते निर्माण राहण्यासाठी आजच्या क्रिकेट सामन्याचा नक्कीच उपयोग होईल.
या स्पर्धेत इंदापूर न्यायाधीश व कर्मचारी, इंदापूर वकील अ, इंदापूर वकील ब आणि बारामती न्यायालय कर्मचारी असे चार संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत मर्यादित दहा षटकांचा सामना खेळविण्यात आला.
अंतिम सामना इंदापूर न्यायाधीश व इंदापूर वकील ‘अ’ संघामध्ये झाला. यात इंदापूर वकील संघाचे कर्णधार ॲड. किरण धापटे यांचा इंदापूर वकील संघ विजयी झाला. अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार इंदापूर जज व कर्मचारी टीममधील स्टेनो रमेश पारवे यांना तर मालिकावीर पुरस्कार ॲड. संतोष खाडे यांना देण्यात आला.
या स्पर्धेत ॲड.सचिन चौधरी, बलभीम देडे यांनी समालोचन करताना सामन्यात रंगत आणली. पंच म्हणून ॲड. विलास बाब्रस व ॲड. भारत कडाळे यांनी कामकाज पाहिले.
या सामन्याच्या वेळी जे.पी. फाऊंडेशनचे तथा सरकारी वकील ॲड. प्रसन्ना जोशी, ॲड.सतीश देशपांडे, ॲड .धनंजय विंचू, ॲड. आनंद देशपांडे, ॲड.अशपाक सय्यद, ॲड.राकेश शुक्ल, ॲड. रणजित चौधरी, ॲड.आसिफ बागवान, ॲड.रवी कोकरे, ॲड.अवधूत डोंगरे, ॲड.राम इंजगुडे, ॲड.सिध्दनाथ लोकरे, ॲड.आकाश सोमवंशी आदी उपस्थित होते.
तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इंदापूर बार असोसिएशनच्या सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.