पुणे : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका आजपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना तारौबायेथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका आजपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना तारौबायेथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने यजमान संघाचा ३-० असा पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे.
या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असेल. एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्यात आलेला हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंतही संघात पुनरागमन करणार आहेत. बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर असलेल्या रविचंद्रन अश्विनला पहिल्या टी २० सामन्यामध्ये संधी मिळाली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघातील बहुतांशी प्रमुख खेळाडू क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. विराट कोहलीने या मालिकेमधून माघार घेतली आहे.
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, रवी बिश्नोई, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग
वेस्ट इंडीज संघ :
शामराह ब्रूक्स, कायले मेयर्स, निकोलस पूरन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ओडियन स्मिथ, जेसन होल्डर, अकिल होसेन, रोमारियो शेफर्ड, ओबेड मॅककॉय, अल्झारी जोसेफ, किमो पॉल