पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कपच्या फायनल सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेसाठी मोहम्मद सिराज डोकेदुखी ठरला. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात लंकेला पहिला धक्का दिला तर सिराजने चौथ्या षटकात ४ विकट्स घेत श्रीलंकेची अवस्था ४ षटकात ५ बाद १२ धावा अशी केली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून एकाच षटकात चार बळी घेणारा मोहम्मद सिराज पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने पथुम निसंका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा आणि कर्णधार दासुन शनाका या पाच फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला.
सिराजने श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाची शिकार करत आपला पाचवा बळी टिपला. त्यानंतर १७ धावा करणाऱ्या कुसल मेंडीसला देखील बाद करत लंकेला सातवा आणि मोठा धक्का दिला. मेंडीसच्या रूपाने सिराजने आपला सहावा बळी टिपला.
दरम्याण, सिराजने घेतलेल्या ६ विकेट्सच्या जोरावर भारताने श्रीलंकेला ५० धावात गुंडाळले. श्रीलंकेची ही वनडे क्रिकेटमधील सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली.