IND vs SA नवी दिल्ली: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग कोहलीने दमदार खेळी करत शतक झळकावले आणि यादरम्यान त्याने वनडेमध्ये सर्वात वेगवान 49 शतकांचा विश्वविक्रम केला. त्याने या बाबतीत भारताचा महान सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. तसेच क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरच्या वनडेतील शतकांच्या विक्रमाची विराट कोहलीने बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरने वनडेमध्ये 49 शतके ठोकली होती. आता या विक्रमाची विराट कोहलीने आज बरोबरी केली आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने स्फोटक कामगिरी सुरूच ठेवली आहे. सलग 7 सामने जिंकून उपांत्य फेरीत स्थान पक्के करणाऱ्या संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही दमदार फलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि अवघ्या 10 षटकांत 91 धावा केल्या. हिट मॅन आऊट झाल्यानंतर विराट कोहलीने जबाबदारी स्वीकारली आणि एक खेळी खेळली ज्याने विश्वविक्रम रचला.
विराट कोहलीने केला विश्वविक्रम
संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 49 वे शतक झळकावले. या एका डावाच्या मदतीने त्याने असे काही केले ज्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. कोहलीने 67 चेंडूत 5 चौकार मारत पन्नास धावा पूर्ण केल्या होत्या आणि यानंतर त्याने डावाला वेग देत आपले शतक पूर्ण केले. सचिन तेंडुलकरने 49 एकदिवसीय शतके पूर्ण करण्यासाठी 452 डाव खेळले होते. विराट कोहलीने अवघ्या 277 डावात हा पराक्रम केला.