IND vs SA: कोलकाता: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरतील. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. मात्र, तरीही विजयासाठी दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा असणार आहे.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 5 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं 3 आणि टीम इंडियानं 2 विजय मिळवले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 90 सामन्यांपैकी भारताने 37 आणि दक्षिण आफ्रिकेनं 50 सामने जिंकले आहेत, तर तीन सामने अनिर्णित राहिले. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल नाही. दक्षिण आफ्रिकेकडून संघात एक बदल करण्यात आला आहे.
भारत प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.