पुणे : भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेइंग-११ मध्ये कर्णधाराने दोन बदल केले आहेत. केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांना वगळण्यात आले आहे.
भारतासाठी आता इंदूरमध्ये होणारा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकला, तर लंडनमध्ये होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचे तिकीट पक्के होणार आहे. त्याचबरोबर सध्या सुरू असलेली बॉर्डर-गावसकर करंडक मालिकाही जिंकता येणार आहे.
राहुलच्या जागी शुभमन गिल आणि शमीच्या जागी उमेश यादवला खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याचवेळी पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद भूषवत असलेल्या स्टीव्ह स्मिथनेही प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील तिसरी कसोटी होळकर क्रिकेट स्टेडियम इंदूर येथे खेळवली जात आहे. पहिल्या दोन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत २-० अशी आघाडी मिळवली आहे. या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत अशा दोन्ही संघांच्या अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात बदल करण्यात आले आहेत.
दरम्यान, हि कसोटी जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकायची आहे. तसेच, हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.
संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नॅथन लियॉन, मॅथ्यू कुहनेमन.