पुणे : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना भारताने २६२ धावा केल्या.
आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात ११३ धावांवर गारद झाला आणि आता भारतासमोर सामना जिंकण्यासाठी ११५ धावांचे लक्ष्य आहे.
दरम्यान, रवींद्र जडेजाने ७ तर आर अश्विनच्या खात्यात ३ विकेट घेतल्याने दिल्लीच्या विजयाचा मार्ग भारतासाठी सोपा झाला. भारताला विजयासाठी ११५ धावांचे लक्ष्य मिळाले होते.