पुणे : हैद्राबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा T-20 सामना होणार आहे. या सामन्याचे तिकीटे खरेदीसाठी प्रेक्षकांची हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर झुंबड उडाली असून पोलिसांनी प्रेक्षकांच्या गर्दीवर लाठीचार्ज केला आहे.
मॅचच्या तिकीट खरेदीसाठी जिमखाना ग्राऊंडटच्या बाहेर पहाटे ३ वाजल्यापासूनच चाहत्यांनी रांग लागली होती. बघता, बघात गर्दी वाढत गेली. अखेर जमाव नियंत्रणाबाहेर गेला. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यामुळे गोंधळ उडाला. सात चाहते जखमी झाले आहेत. यात ४ महिला, ३ पुरुष आणि एका पोलिसाचा समावेश आहे.
This is so disappointing. Passionated fans gathered at Gymkhana Ground to collect India Vs Australia tickets in Hyderabad and they’re getting such treatment. pic.twitter.com/OIP96BClOH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 22, 2022
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या T-20 सीरीज सुरु आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. तिसरा सामना हैदराबादमध्ये होणार आहे. नागपूरनंतर टीम इंडिया हैदराबादला रवाना होणार आहे.
दरम्यान, हैदराबादमध्ये चाहते बऱ्याचकाळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचची वाट पाहत होते. ३ वर्षानंतर या ठिकाणी सामना होणार आहे. हैदराबादमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर २०१९ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध झाला होता. त्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना झाला नाही.