ICC Fined : पुणे : एजबॅस्टन कसोटीत स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला मोठा दंड ठोठावला आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या मानधनातील ४० टक्के रकमेला आणि डब्ल्यूटीसीच्या २-२ गुणांना कात्री लावली आहे. (ICC Fined)
सध्या दोन्ही संघांमध्ये ॲशेस मालिका सुरू आहे. यतील पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी गुणतालिकेत १२ गुणांसह खाते उघडले, परंतु आता आयसीसीच्या दंडात्मक कारवाईनंतर त्यांच्या खात्यात फक्त १० गुण जमा झाले आहेत. तर इंग्लंडला खात्यात ४ ऐवजी २ गुण मिळाले आहेत. (ICC Fined)
एजबॅस्टन (बर्मिंगहॅम) येथे झालेल्या ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 2 गडी राखून पराभव केला. यावबरोबर त्यांनी डब्ल्यूटीसीच्या तिस-या पर्वाची शानदार सुरुवात केली. (ICC Fined) हा सामना अतिशय रंजक झाला आणि शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ विजयी होईल याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली होती. पण रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारत इंग्लिश संघाच्या तोंडचा घास हिरावून घेतला. (ICC Fined)
पण या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी आयसीसीने ऑस्ट्रेलियासह इंग्लंडला धक्का दिला आहे. आयसीसीने स्लो ओव्हर रेटच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे दोन गुण वजा केले आहेत. (ICC Fined) यासोबतच दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या मॅच फीच्या ४० टक्के दंडही ठोठावला आहे. सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे दोन गुण वजा केले आहेत. (ICC Fined)
दरम्यान, इंग्लंडच्या खात्यात अजून एकही गुण नाही, त्यामुळे जेव्हा कधी इंग्लंड पहिला सामना जिंकेल तेव्हा जमा होणा-या गुणांमधून दोन गुणांना कात्री लावली जाईल. (ICC Fined) त्याचा परिणाम आता फारसा दिसत नसला तरी आगामी काळात डब्ल्यूटीसीचे सामने सुरू असताना ते खूप घातक ठरू शकते. (ICC Fined)