पुणे : आशिया कपमधील ग्रुप A मधील दुसरा सामना भारत आणि हाँगकाँग यांच्यात रंगणार आहे. हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आजच्या सामन्यात एक बदल केला आहे. गेल्या सामन्यातील स्टार प्लेअर हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळाली आहे.
यूएई येथे सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत. भारताने पाकिस्तानसोबत झालेल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आज (३१ ऑगस्ट) भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढत होत आहे. या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भारताचा संघ हाँगकाँगच्यात तुलनेत सरस मानला जातो. असे असले तरी हा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. तसेच केएल राहुल, विराट कोहली यासारख्या फलंदाजांना त्यांचा खेळ सुधारण्याची ही एक नामी संधी आहे.
हाँगकाँग संघाचे प्लेइंग इलेव्हन
निझाकत खान (कर्णधार), यासीम मुर्तझा, बाबर हयात, किनचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅकेचनी (यष्टीरक्षक), झिशान अली, हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर
भारतीय संघाचे प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग