GT vs CSK MS Dhoni : पुणे : आयपीएल 2023 चा पहिला क्वालिफायर सामना 23 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पार पडला. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना खेळला गेला. चेन्नईने हा सामना 15 धावांनी जिंकला. मात्र चेन्नईचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीच्या हातून मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे धोनीवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (The match was won but there is a possibility of action against Dhoni)
धोनीने अंपायर्ससोबत वाद घातला
गुजरातची टीम बॅटिंग करताना शेवटच्या काही ओव्हर्समध्ये धोनीने मैदानावरील अंपायर्ससोबत वाद घातला. त्यामुळे सामन्याला चार मिनिटं उशिर झाला.(GT vs CSK MS Dhoni) गुजरातची बॅटिंग सुरु असताना, 16 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. माथीशा पाथीराणााला दुसरी ओव्हर टाकण्यापासून मनाई करण्यात आली. श्रीलंकेच्या या वेगवान गोलंदाजाने नऊ मिनिटांचा ब्रेक घेतला होता.
तो मैदानाच्या बाहेर गेला होता. जेव्हा तो गोलंदाजीसाठी आला, तेव्हा अंपायर्सनी त्याला रोखलं व धोनीसोबत चर्चा केली. (GT vs CSK MS Dhoni) पाथिराणाने ब्रेकनंतरचा मैदानावरील वेळ पूर्ण केलेला नाही, असं अंपायर्स म्हणणं आहे.
धोनीने पाच मिनिट अंपायर्ससोबत वाद घातला. (GT vs CSK MS Dhoni) अंपायर्ससोबत 5 मिनिट वाद घातला. हे अनावश्यक आहे. यामुळे खेळ थांबलाय. त्याऐवजी दुसऱ्या बॉलरला गोलंदाजी द्या. मॅच संपल्यानंतर धोनीने या बद्दल खेद व्यक्त करावा” असं सायमन डुल ऑनएअर यांनी मत व्यक्त केलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : पुण्यातील मारुंजी गावच्या पठ्ठ्याची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड