चेन्नई: IPL 2024 चा 22 वा सामना आज (8 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात होणार आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चितांबरम स्टेडियमवर होणार आहे. सामन्यापूर्वी केकेआरचे मेंटॉर गौतम गंभीर म्हणाले की, धोनी मैदानावर इतका आक्रमक नाही. पण जर तो फलंदाजी करत असेल तर एका षटकात 20 धावा काढण्याची क्षमताही त्याच्यात आहे.
गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर धोनीबद्दल बोलताना सांगितले की, “आम्ही मैदानाबाहेर आम्ही एकमेकांचा आदर करणारे मित्र आहोत. CSK आणि KKR चे कर्णधार म्हणून जेव्हा धोनी आणि मी आमनेसामने येतात तेव्हा फक्त विजयावरच लक्ष असायचे. मला माझ्या संघासाठी जिंकायचे आहे आणि धोनीलाही तेच करायचे आहे. यामुळेच तो भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.”
गंभीर पुढे म्हणाला, “चेन्नईला एका षटकात 20 धावांची गरज असली आणि एमएस धोनी फलंदाजी करत असला तरीही तो खेळ पूर्ण करू शकतो. सुपर किंग्ज लाइनअपमधील कोणालाही आव्हान देण्यासाठी माझ्याकडे गोलंदाजी आक्रमण आहे, हे मला माहीत आहे. महेंद्रसिंग धोनी मैदानावर फारसा आक्रमक नसला तरी तो कधीही हार मानत नाही. चेन्नई हा असा संघ आहे जो शेवटचा चेंडू टाकेपर्यंत लढतो. खेळ संपेपर्यंत तुम्ही त्यांना हरवू शकत नाही हे तुम्हाला माहीत आहे.”
CSK विरुद्ध KKR ची प्लेइंग इलेव्हन अशी असू शकते: फिल सॉल्ट, सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण