Dhammika Niroshan : श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी. आज बुधवारी श्रीलंकेचा 41 वर्षीय माजी क्रिकेटपटू धम्मिका निरोशन याची राहत्या घरी अज्ञात इसमांनी गोळ्या घालून हत्या केली आहे.
This is Dhammika Niroshan. Former Sri Lanka U19 captain. Maharoof, Angelo, Upul and few top players played under his leadership for few year. For me he is one of the most promising genuine fast bowling all rounders 🇱🇰 had. Unfortunately, choose not to continue cricket at 20. pic.twitter.com/IgRFjeO7gV
— Amila Kalugalage (@akalugalage) February 3, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरोशान त्याची पत्नी आणि दोन मुलांसह घरी होता. त्यावेळी त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी पत्नी आणि मुलांसमोरच गोळ्या झाडल्या. गोळीबारामागचा हेतू अद्याप समजला नाही. संशयित व्यक्ती अद्याप फरार आहे. अंबालनगोडा पोलीस गुन्हेगाराला पकडण्यासाठी आणि गुन्ह्याचे कारण शोधण्यासाठी तपास करत आहे.
दरम्यान, माजी क्रिकेटपटू निरोशानने श्रीलंकेच्या 19 वर्षाखालील संघाचे प्रतिनिधित्व केले आणि 2000 मध्ये सिंगापूरविरुद्घ त्याने पदार्पण केले. तो दोन वर्षे 19 वर्षाखालील संघाकडून कसोटी आणि वन डे क्रिकेट खेळला आहे. दहा सामन्यात संघाचे नेतृत्वही केलं आहे.