बंगळुरू: भारतीय क्रिकेट वर्तुळातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. भारताच्या एका 34 वर्षीय क्रिकेटपटूचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. या खेळाडूच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात एकच शोककळा पसरली आहे.
कर्नाटकाचा माजी क्रिकेटर के होयसला यांचे विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मैदानात टीमच्या विजयाचा जल्लोष करताना के होयसलाच्या छातीत दुखु लागले. त्यानंतर होयलाचे निधन झालं. हा सर्व प्रकार एजिस साऊथ झोन स्पर्धेतील एका सामन्यानंतर घडला. हा सामना बंगळुरूतील आरएसआय क्रिकेट मैदानावर पार पडला. या सामन्यात कर्नाटक विरुद्ध तामिळनाडू आमनेसामने होते. कर्नाटकाने हा सामान जिंकला. नेहमीप्रमाणे विजयानंतर खेळाडूंकडून जल्लोष करण्यात आला, यामध्ये होयसला याचाही समावेश होता.
विजयाचा जल्लोष करत असताना होयसलला छातीत त्रास जाणवू लागला. तो मैदानातच बेशुद्ध झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. हा घटना 22 फेब्रुवारीला घडली. मात्र 23 फेब्रुवारीला सर्व प्रकार जगासमोर आला.
कोण होते के होयसला
के. होयसला ऑलराउंडर एक होता. होयसला मधल्या फळीत बॅटिंग करायचा. होयसला वेगवान गोलंदाज देखील होता. होयसलाने अंडर 25 कर्नाटकचं प्रतिनिधित्व केलं. तसेच कर्नाटक प्रीमियर लीगमध्येही तो सहभागी झाला होता. दरम्यान होयसला याच्या निधनावर कर्नाटकाचे मंत्री दिनेश गुंडू यांनी सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केला. “होयसलाच्या निधनाचं वृत्त समजलं. फार वाईट वाटलं. कुटुंबियांना या धक्क्यातून सावरण्याची ताकद मिळो. मी त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रांच्या पाठीशी आहे.”, असं गुंडू यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.