पार्थ : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग हा ऑस्ट्रेलिया – वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान सुरु असलेल्या लढतीत समालोचन करत असताना एकदम प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्याच्या वेस्ट इंडिजचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सुरु असललेल्या पहिल्या कसोटी लढतीसाठी माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग समालोचन करत होता. यावेळी एकदम त्याची प्रकृती ढासळली. लाईव्ह लढतीत हा प्रकार झाल्याने सर्वाचीच चांगलीच धावपळ झाली.
लढतीमध्ये उपहाराच्या वेळेस पॉन्टिंगची तब्येत खराब झाली होती. सध्या रिकी पॉन्टिंगची प्रकृती स्थिर आहे असून योग्य उपचारानंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे.