ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेबात एक मोठी बातमी समोर येत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच यजमान पाकिस्तानही टीम इंडियासाठी माघार घेण्यास तयार नाही. आयसीसीने पाकिस्तानसमोर हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला होता,परंतु, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अद्याप त्याबाबत काहीच कळवण्यात आलेलं नाही. पाकिस्तानच्या या आडमुठेपणामुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करणं लांबवणीवर पडलं आहे. अशातच आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी घोषणा केली आहे.
आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदकडून चॅम्पियन्स ट्रॉफी टूर शेड्यूल जाहीर करण्यात आलं आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार, एकूण 8 देशांमध्ये ही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फिरवण्यात येणार असून या ट्रॉफी टूरला आज 16 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तानमध्ये 16 ते 25 पर्यंत ट्रॉफी टूर होणार आहे. पाकिस्तानमधील विविध शहरांमध्ये ही ट्रॉफी फिरवण्यात येणार आहे.
पाकिस्ताननंतर, अफगाणिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अखेरीस भारत असा या ट्रॉफीचा टूर असणार आहे. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकात कोणत्या देशात कोणत्या तारखेला ट्रॉफी टूर असेल, याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
भरतात ‘या’ तारखे दरम्यान होणार चॅम्पियन्स ट्रॉफी..
दरम्यान भारतात 15 ते 26 जानेवारी दरम्यान ट्रॉफी टूर आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार आता भारतातील कोणत्या मुंबईसह इतर कोणत्या शहरांमधील क्रिकेट चाहत्यांना ही ट्रॉफी पाहता येईल? याची प्रतिक्षा क्रीडा प्रेमींना लागली आहे.