पुणे : भारताचा कर्णधार रोहित शर्माने कॅप्टन्स इनिंग खेळत भारताला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला. भारताने ऑस्ट्रेलियाचे ९१ धावांचे आव्हान षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. रोहित शर्माने २० चेंडूत नाबाद ४६ धावा केल्या. दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच दोन चेंडूवर एक षटकार एक चौकार मारत सामना संपवला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अक्षर पटेलने टाकलेल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराट कोहलीकडून कॅमेरून ग्रीनचा सीमारेषेवर झेल सोडला. पण, पुढच्याच चेंडूवर विराट व अक्षरने त्याला रन आऊट करून ऑसींना पहिला धक्का दिला. अक्षरने अखेरच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेला (०) आणि पुढच्या षटकात टीम डेव्हिडला (२) बाद केले. त्याने २ षटकांत १३ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. पाचव्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला.त्याच्या षटकाच्या अखरेच्या चेंडूवर भन्नाट यॉर्कर टाकून फिंचचा त्रिफळा उडवला. त्याने १५ चेंडूंत ३१ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या ९१ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने दणक्यात सुरुवात केली, सुरुवातीपासूनच रोहितने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करायला सुरुवात केली. यावेळी जुना हिटमॅन पुन्हा एकदा पाहायला मिळता. पण दुसऱ्या बाजूला लोकेश राहुल हा झटपट बाद झाला. राहुलने यावेळी १० धावा केल्या.
राहुलनंतर विराट कोहली फलंदाजीला आला आणि त्याने दमदार सुरुवात केली. पण यावेळी ११ धावांवर तो बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. त्यानंतरच्या चेंडूवर सूर्यकुनार यादव बाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. पण यावेळी रोहित मात्र खेळपट्टीवर ठाम उभा होता आणि विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी तो सज्ज असल्याचे पाहायला मिळत होते.