रावळपिंडी : इंग्लंड संघाने पहिल्या दिवशी ७५ षटकांत ४ बाद ५०६ धावा केल्या होत्या. मात्र लढतीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव गडगडला असून इंग्लंडचा डाव १०१ षटकांत ६५७ धावांवर संपुष्टात आला.
रावळपिंडी येथे इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील कसोटी लढत सुरु आहे. काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आघाडीच्या ४ फलंदाजांनी शतके झळकाविताना इंग्लंड संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. यात झॅक क्रावली, बेन डकेट, ओली पोप व हॅरी ब्रुक यांनी शतके झळकावली.
दिवसअखेर हॅरी ब्रुक १०१ व बेन स्टोक्स ३४ धावांवर खेळात होते. यावेळी इंग्लंडने ७५ षटकांत ४ बाद ५०६ एवढी धावसंख्या उभारली होती.
आज मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा लय प्राप्त करताना इंग्लंडच्या फलंदाजांना जखडून ठेवले. काल १०१ धावांवर नाबाद असणाऱ्या हॅरी ब्रुकने कालच्या १०१ धावांत ५६ धावांची भर घालून परतला. बेन स्टोक्स देखील ४१ धावा करून बाद झाला. त्यानंतर विल जॅकस व ऑली रॉबिन्सन यांनी अनुक्रमे ३० व ३७ धावांची खेळी केली. जेम्स अँडरसनने ६ धावा केल्या.
पाकिस्तान संघाकडून झाहीद महमूदने ४, निशम शहाने ३, मोहम्मद अलीने २ तर हरिसरौफ ने एक गडी बाद केला.
उपहारापूर्वी पाकिस्तान संघाने फलंदाजीला सुरुवात केली. ६ षटकांत पाकिस्तान संघाने बिनबाद १७ धावा केल्या आहेत. अब्दुल्लाह शफिक ६ तर इमाम उल हक ११ धावांवर खेळत आहेत. पाकिस्तान अजूनही ६४० धावांनी पिछाडीवर आहे. लढतीत अजून साडे तीन दिवसांचा खेळ बाकी आहे.