रावळपिंडी : आज इंग्लंड संघाने पाकिस्तानी गोलंदाजांना समाचार घेताना कसोटी लढतीत पहिल्याच्या दिवशी ५०० धावांचा टप्पा ओलांडला. इंग्लंडच्या तब्बल ४ खेळाडूंनी फलंदाजांनी दमदार शतके झळकावली. पाकिस्तानला दिवसभरत केवळ ४ गडी बाद करता आले.
रावळपिंडी येथील मैदानावर आजपासू सुरू झालेल्या कसोटी लढतीत इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिला दिवस गाजविला. इंग्लंडने खेळ थांबविला तेव्हा ७५ षटकांत ४ बाद ५०६ धावांपर्यंत मजल मारली होती.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा .निर्णय घेतला. इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रावली व बेन डकेट यांनी ३५.४ षटकांत तब्बल २३३ धावांची सलामी दिली. झॅक क्रावलीने १११ चेंडूत २१ चौकारांच्या साहाय्याने १२२ धावांची खेळी केली. त्याला दुसरा सलामीवीर याने बेन डकेट याने ११० चेंडूत १५ चौकारांच्या साहाय्याने १०७ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या ओली पोपने देखील आक्रमक पावित्रा घेताना शतक झळकावले. पोपने १०८ धावांची खेळी १४ चौकारांच्या साहाय्याने सजविली.
पहिल्या तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली. मात्र हीच किमया अनुभवी जो रूटला करता आली नाही. जो रूटबने ३ चौकारांच्या साहाय्याने २३ धावांची खेळी केली. हॅरी ब्रुकने देखील पाकिस्तानाच्या गोलंदाजांचा घाम गळताना केवळ ८१ चेंडूत १४ चौकार व २ षटकारांच्या साहाय्याने नाबाद १०१ धावा तडकावल्या. दिवसअखेर हॅरी ब्रुक १०१ व बेन स्टोक्स ३४ धावांवर खेळात होते.
पाकिस्तानकडून झाहीद मेहमूदने २ तर मोहम्मद अली व हरिस रौफ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.