मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडमध्ये टी -२० मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. रोहितसेनाने इंग्लंडवर दुसऱ्या टी-२० सामन्यात ४९ धावांनी विजय मिळवला. भारताने या विजयासह २ -० अशा एकतर्फी फरकाने मालिका खिशात घातली.
टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी १७१ धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताकडून भुवनेश्वर कुमारने भेदक मारा करत तीन विकेट घेतल्या. त्याने इंग्लंडच्या जेसन रॉयला इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर बाद करत दमदार सुरूवात केली होती. त्याला भारताकडून जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत चांगली साथ दिली. इंग्लंडकडून मोईन अलीने ३५ तर डेव्हिड विलीने ३३ धावांचे योगदान दिले.
भारतीय गोलंदाजांनी गोऱ्या साहेबांना १७ ओव्हरमध्ये १२१ धावांवरच गुंडाळलं. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. तर डेव्हिड विलीने नाबाद ३३ रन्स केल्या. मात्र तो टीमला विजयापर्यंत पोहचवण्यात अपयशी ठरला. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याने जॉस बटलर, जेसन रॉय आणि रिचर्ड या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या आणि हर्षल पटेल या जोडीने १-१ विकेट गोलंदाजांना चांगली साथ दिली.
दरम्यान या टी -२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा १० जुलैला खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी आहे. तर इंग्लंडचा तिसरा सामना जिंकून गोड शेवट करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात काय होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.