Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 8 जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 June 2025, 18:04
eight feared dead in stampede during RCB's IPL win celebrations in Bengalur

नवी दिल्ली: आयपीएल 2025 चॅम्पियन आरसीबीच्या स्वागतासाठी एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती. स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी गेट उघडताच चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आठ चाहत्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी, अनेक लोक जखमी झाल्याचे समोर येत आहे. स्टेडियमबाहेर इतकी गर्दी होती की, चाहते भिंतीवरून उडी मारून आत जात होते. काहीजण तर झाडांवर चढून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ही चेंगराचेंगरी स्टेडियमच्या गेट क्रमांक 1 जवळ झाली आहे. स्टेडियममध्ये पोहोचण्यापूर्वी आरसीबीचे खेळाडू विधानसभेत पोहोचले होते. जिथे मुख्यमंत्र्यांनी सर्व खेळाडूंचा सन्मान केला. यानंतर, खेळाडूंची टीम बस चिन्नास्वामी स्टेडियमकडे रवाना झाली. आरसीबीची ही विजयी परेड लक्षात घेऊन बेंगळुरूमध्ये वाहतूक पोलिसांनी नागरिकांना त्याबाबत सूचना देखील केल्या होत्या.

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
यापूर्वी, बेंगळुरू वाहतूक पोलिसांनी X वर जारी केलेल्या निवेदनानुसार, वाहतूक समस्येमुळे विधान सौधा ते स्टेडियमपर्यंतची बहुप्रतिक्षित ओपन-रूफ बस परेड होऊ शकत नाही. त्यानंतर आरसीबीने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, ‘आम्ही सर्व चाहत्यांना पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची विनंती करतो, जेणेकरून सर्वांना शांततेत आनंद घेता येईल.’

तथापि, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरचे दृश्य वेगळे होते. मोठ्या पोलिस बंदोबस्ताच्या उपस्थितीत, चाहते आत जाण्यासाठी धडपडत होते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विधान सौधाबाहेर हजारो चाहते वाट पाहत असल्याचेही दिसून आले. शहरातील पावसाळी वातावरणामुळे अधिकाऱ्यांना असा निर्णय घ्यावा लागला. यासोबतच, आरसीबीच्या विजयानंतर मंगळवारी रात्री गर्दी नियंत्रित करण्यात पोलिसांना खूप अडचणींचा सामना करावा लागला.

 

आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध आरसीबीने विजय मिळवल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून चाहते रस्त्यावर उतरले. बेंगळुरूमध्ये रात्रभर फटाके वाजवून चाहत्यांनी विजयाचा आनंद साजरा केला. यानंतर, पुन्हा एकदा सकाळी चाहत्यांची गर्दी रस्त्यावर येऊ लागली. आरसीबी संघाचा विजयोत्सव दुपारी 3 वाजता सुरू होणार होता, परंतु गर्दी इतकी वाढली होती की, त्याची वेळ बदलावी लागली. जास्त गर्दीमुळे प्रशासनालाही त्यावर नियंत्रण ठेवण्यात खूप अडचणी आल्या आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

भिगवणमधील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे कधी बुजवणार? ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp