नवी दिल्ली: भारताची प्रख्यात जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने सोमवारी तडकाफडकी निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी भारताची पहिली महिला जिम्नॅस्ट म्हणून ३१ वर्षीय दीपा ओळखली जाते. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपाचे कांस्यपदक ०.१५ सेकंदांनी थोडक्यात हुकले. यामुळे व्हॉल्ट प्रकारात दीपा चौथ्या स्थानावर राहिली. रिओनंतर दीपाला दुखापतीने घेरल्यामुळे पुनरागमन लांबणीवर पडले होते. परिणामी, २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी दीपाला गमवावी लागली.
२०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दीपाचे परतणे अशक्य मानले जात होते. वाढते वय लक्षात घेता दीपाला नाईलाजाने निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला. दीपा निवृत्तीसंदर्भात निवेदनात म्हणते, खूप विचार केल्यानंतर स्पर्धात्मक जिम्नॅस्टिकमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. नक्कीच हा सोपा निर्णय नव्हता; पण मला वाटते की, ही योग्य वेळ आहे. जिम्नॅस्टिक माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. जोपर्यंत मला आठवत आहे आणि चढ-उतार आणि यामधील प्रत्येक क्षणासाठी कृतज्ञ आहे, असे दीपा प्रसिद्धी पत्रकातून आपल्या भावना व्यक्त करताना