मुंबई : भारताला T-20 वर्ल्डकपमध्ये व वनडेमध्ये जगभरातक भारताल चमकावणारा प्लेअर म्हणजे एसएस धोनीची पुन्हा एन्ट्री होणार आहे. सेवानिवृत्त झालेला भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीवर BCCI नवीन जबाबदारी देणार आहे.
धोनीला मर्यादित षटकांसाठी (T20 आणि ODI) प्रशिक्षक किंवा संचालक बोर्डावर घेतले जाणार आहे.
भारतीय संघाचा यंदाच्या T-20 वर्ल्डकपमध्ये झालेली पराभवाची नामुष्की पाहता, बीसीसीआय आगामी काळात टीममध्ये मोठे बदल करू पाहत आहे.त्यामुळे धोनीला BCCI नवीन जबाबदारी देणार आहे.
एकंदरीत भारतीय संघातील नव्या दमाच्या प्लेअर्सच्या जडणघडणीसाठी धोनीची पुन्हा एंट्री होणार आहे. माध्यमातील अहवालानुसार, बीसीसीआय इंग्लंडच्या धर्तीवर मर्यादित षटकांसाठी आणि कसोटींसाठी स्वतंत्र संघ तयार करण्याचा विचार करत आहे.
एवढेच नाही तर या संघांसाठी वेगवेगळे कोचिंग स्टाफही नियुक्त करता येईल.
राहुल द्रविडवरील वर्कलोड कमी करण्यासाठी बोर्ड कोचिंगची भूमिका सामायिक करण्यावर विचार करत आहे. धोनीच्या टी-20 फॉरमॅटमध्ये समावेश करण्याबाबत विचार केला जात असल्याचे मानले जात आहे.
यामुळे टीम इंडियाचा या फॉरमॅटचा दर्जा उंचावला जाऊ शकतो. या महिन्याच्या अखेरीस बोर्डाच्या सर्वोच्च परिषदेची बैठक होणार असून धोनीचा मुद्दा चर्चेसाठी येऊ शकतो. दरम्यान, यापुर्वी धोनीशी चर्चा केली जाणार आहे.