Graham Thorpe Dies : इंग्लंडचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्फ यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वयाच्या 55 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ग्रॅहम थॉर्फ यांने 12 वर्ष इंग्लंड क्रिकेटचे प्रतिनिधीत्व केले. कसोटी क्रिकेटमध्ये 6744 धावा केल्या. ग्रॅहम यांच्या मृत्यूनंतर चाहत्यांनी शोक व्यक्त केले आहे. या घटनेने कुटुंबावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे.
It is with great sadness that we share the news that Graham Thorpe, MBE, has passed away.
There seem to be no appropriate words to describe the deep shock we feel at Graham’s death. pic.twitter.com/VMXqxVJJCh
— England and Wales Cricket Board (@ECB_cricket) August 5, 2024
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोमवारी सरेचा महान फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचे निधन झाल्याची माहिती दिली. ग्रॅहम थॉर्फ हे गेल्या बऱ्याच काळापासून आजारी होते. ग्रॅहम थॉर्प यांनी चार दिवसांपूर्वी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा केला होता. थॉर्प यांच्या आजाराबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते बऱ्याच दिवसांपासून आजाराने त्रस्त होते.
थॉर्प यांनी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांसारख्या महान भारतीय फलंदाजांच्या युगात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे. त्यांचा समावेश इंग्लंडच्या त्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये होतो, ज्यांनी 100 कसोटी सामने खेळले आहेत. थॉर्प यांनी भारताविरुद्ध 5 कसोटी सामने खेळले होते. याशिवाय त्यांनी भारताविरुद्ध एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.
ग्रॅहम थॉर्प हे केवळ खेळाडूच नव्हे तर प्रशिक्षक म्हणूनही खूप लोकप्रिय होते. थॉर्प यांनी 2005 मध्ये न्यू साउथ वेल्सचे प्रशिक्षकपद भूषवले आणि त्यानंतर त्यांना इंग्लंड लायन्सचे प्रशिक्षक बनवण्यात आले. तरुण खेळाडूंना तयार करणे हे त्यांचे काम होते. 2013 च्या सुरुवातीस, थॉर्प इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-20 संघांचे फलंदाजी प्रशिक्षक बनले. 2020 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान ते संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनले. 2022 मध्ये थॉर्प हे अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक बनले, पण हे पद स्वीकारण्यापूर्वीच त्यांना गंभीर आजारानचे निदान झाले.