पुणे प्राईम न्यूज: दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडिअमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सामना सुरु आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परंतु, भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. दिल्लीतील खेळपट्टी पाहून भारतीय संघाने शार्दूल ठाकूर याला अंतिम अकरामध्ये स्थान दिले आहे. आर. अश्विन याला आराम देण्यात आला आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
अफगाणिस्तान संघ
रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हश्मतुल्लाह शाहीदी (कर्णधार), मोहम्मद नबी, नजीबुल्ला जादरान, अजमतुल्ला ओमरजई, राशिद खान, नवीन उल-हक़, मुजीब उर रहमान, फजलहक़ फारुकी.