Cricket News नवी दिल्ली : आशिया चषकाबाबत सातत्याने वाद होत आहेत. आता पुन्हा एकदा वेळापत्रकाला विलंब झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेऊन परिस्थितीबाबत चर्चा केली. (Cricket News) पीसीबीचे नवे प्रमुख श्रीलंकेसोबत यजमानपदाचे अधिकार शेअर करण्याबद्दल खूश नाहीत. (Cricket News) यावेळी आशिया चषक पाकिस्तानातच व्हावा, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे हायब्रीड मॉडेलवर पुन्हा विचार होणार आहे. (Cricket News)
आशिया चषकाबाबत बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये वाद सुरू आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया चषक 2023 वर पुन्हा यू-टर्न घेतला आहे. त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यात परिस्थितीवर चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा होणार आहे. वास्तविक, झका अश्रफ नुकतेच पीसीबीचे नवे प्रमुख झाले. मात्र, आशिया कपच्या प्रस्तावित वेळापत्रकावर ते खूश नसल्याचे सांगितले जात आहे.
पराभवाच्या भीतीनेच खेळण्यास नकार
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देणारा भारत हा एकमेव संघ आहे. 1997-98 ही वर्षे वगळता भारत आमच्याविरुद्ध फारसा खेळला नाही, कारण त्यांना पराभवाची भीती होती. पाकिस्तानचा संघ खूप चांगला होता आणि भारत अनेकदा आमच्याविरुद्ध हरला आहे, असे माजी खेळाडू अब्दुल रझाकने म्हटले आहे.