अजित जगताप
वडूज : सोहम महेश गुरव याची सातारा जिल्हा १९ वर्षाखालील शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये फ्री स्टाईल या प्रकारातील ९७ किलो वजनी गटात निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचा वडूज पंचायत समितीच्या आवारात सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीकांत गोसावी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
औंध येथील राजा भगवंतराव पंतप्रतिनिधी हायस्कूलमध्ये ते सध्या शालेय शिक्षण घेत आहेत.
औंध येथील हायस्कूलचे क्रीडा शिक्षक निकम सर, पै रवि गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. खटावचे प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीकांत गोसावी, डॉ.महेश गुरव,रामभाऊ जाधव,धनंजय चव्हाण, माजी सरपंच राजू फडतरे, पत्रकार शरद कदम,अजित जगताप, विजय शेटे, बंडा तथा विजय पवार,नामदेव मोरे, सचिन साठे, प्रमोद निंबाळकर, धनंजय चव्हाण, सतीश साठे,सौ रीना जावळे, तुकाराम खाडे यांच्या उपस्थितीत पै गुरव यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.