अजित जगताप
सातारा : सातारा जिल्हा परिषद वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२२-२३ साठी दि. १० ते १२ फेब्रुवारी या कालावधीमध्ये महोत्सव होत आहे. त्यामुळे खटाव तालुक्यातील वडूज पंचायत समितीचे शासकीय कर्मचारी- अधिकाऱ्यांनी आज रंगीत तालीम करून स्पर्धेमधील विजेतेपदासाठी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
आज सकाळी टाळ मृदंगाच्या निनादात ह.भ.प. राजेंद्रकुमार कोरे, उर्मिला साळुंखे, दिपाली माळी, संगीता गायकवाड, काजल कुंभार, तसेच दशरथ शिंगाडे, ह. भ. प. मारुती जाधव, किरण उदमले, संगीता काकडे, सतीश बोराटे, स्वाती राऊत, डी.एम भिसे, लीना साळुंखे, सुवर्णा कारंडे, संगिता पाटोळे, स्वप्नाली मेढेकर, पूजा गायकवाड, वर्षाराणी उमासे, ज्योती देशमुख, सुमन पवार, मनिषा मायणे, तुकाराम खाडे, विजय पवार कैलास गायकवाड नंदकिशोर माने संजय सोनवले संजय कापसे तसेच कोरे, शिंदे आदींनी यात सहभाग घेतला.
सकाळी पंचायत समितीच्या आवारात”’ ग्यानबा तुकाराम” ‘ज्ञानबा तुकाराम” ” म्हणत ही दिंडी निघाली होती. हातात भगवी पताका तसेच टाळ बुद्रुक याचा संगीतमय वातावरणात भक्तीभावाने निघालेल्या या छोट्याशा दिंडीने अनेकांना आषाढी वारीची आठवण झाली.
सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत होणाऱ्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवानिमित्त सर्व शासकीय कार्यालयांमध्ये रंगीत तालीम सुरू आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग तसेच पंचायत समितीच्या इतर विभागातील अधिकारी- कर्मचारी वर्ग यामध्ये सहभागी झाले होते. अत्यंत धार्मिक व भक्तीभावाने निघालेल्या या दिंडीमुळे परिसरात चैतन्याचे वातावरण पसरले होते. अनेकांनी स्पर्धकांना विजेते होण्याच्या शुभेच्छा दिल्या.