नवी दिल्ली : बुद्धिबळ विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अझरबैजानच्या बाकू शहरात आज खेळला गेला. हा सामना भारताचा 18 वर्षीय तरुण ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंद आणि नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन यांच्यात खेळला गेला. मात्र, दोन्ही सामने अनिर्णित राहिले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंच्या एकमताने गुरुवारी टायबेकरच्या माध्यमातून चॅम्पियनचा निर्णय होणार आहे.
प्रज्ञानानंदन याने बुद्धिबळ विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू फॅबियानो कारुआनाचा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. त्याने कारुआनाचा 3-5 आणि 2-5 असा पराभव केला. युवा खेळाडूसाठी हा ऐतिहासिक विजय ठरला. दोन सामन्यांची क्लासिकल मालिका 1-1 अशी बरोबरी राहिल्यानंतर प्रज्ञानानंदनने अमेरिकन ग्रँडमास्टरचा टायब्रेकरमध्ये पराभव केला.
वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय मास्टर
आर. प्रज्ञानानंदन हा देशातील तरुण प्रतिभावान ग्रँडमास्टर ठरला आहे. वयाच्या 10 व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय मास्टर बनला. जेव्हा त्याने ही खास कामगिरी केली तेव्हा तो त्यावेळचा सर्वात तरुण खेळाडू होता. सुमारे दोन वर्षांनी वयाच्या 12 व्या वर्षी तो ग्रँडमास्टर झाला. त्या काळातही त्यांनी विशेष कामगिरी केली होती.