IPL : मुंबई : आयपीएलमध्ये शनिवारी डबल हेडर सामन्यातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने असणार आहेत. चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्लेऑफची शर्यत पाहता सर्वांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. आजचा सामना जिंकून दोन्ही संघांना गुणतालिकेत दुसरे स्थान गाठण्याची संधी आहे. मात्र, चेपॉकमध्ये धोनीच्या संघाशी मुकाबला करणं कुणालाही सोपं राहिलेलं नाही. पण चेपॉकमध्ये चेन्नईचा मुंबईविरुद्धचा विक्रम फारसा बरा नाही.
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात गुणतालिकेत दुसरे स्थान गाठण्यासाठी ही लढत आहे. आज जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असेल. इतकंच नाही तर त्याच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याची शक्यताही वाढणार आहे. सर्वाधिक पाच वेळा विजयी ठरलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या मोसमात चढ-उतारामधून जावे लागले आहे. मात्र मागील दोन लढतींमध्ये रोहित शर्माच्या सेनेने राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्स यांना पराभूत करून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान कायम राखले आहे.
मुंबई इंडियन्सला आज सलग तिसऱ्या विजयाची आस असणार आहे; मात्र त्यांच्यासमोर महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान असेल. मागील तीनपैकी दोन लढतींमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून एक लढत पावसामुळे रद्द झाली आहे.
दरम्यान, पॉइंट टेबलमध्ये सीएसके ११ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स १० गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. आज जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत गुजरात टायटन्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. चेन्नई जिंकल्यास त्याचे १३ गुण होतील आणि मुंबई जिंकल्यास १२ गुण होतील. एवढेच नाही तर आजचा सामना जिंकल्यास या संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचणेही सोपे होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना भिडले ; व्हिडीओ व्हायरल