चेन्नई: चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत 206 धावांची मोठी धावसंख्या उभारली. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांच्यातील ६२ धावांच्या भागीदारीने सीएसकेला सामन्यात आघाडीवर आणले होते. गायकवाडने 36 चेंडूत 46 धावांची खेळी केली, तर रवींद्रने अवघ्या 20 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार लगावत 46 धावा केल्या. समीर रिझवीने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. चेन्नईने 206 धावा केल्या आहेत, त्यामुळे गुजरातला विजयासाठी 207 धावा कराव्या लागणार आहेत.
अजिंक्य रहाणे केवळ 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, मात्र तो बाद झाल्यानंतर शिवम दुबे क्रीजवर आला, त्याने येताच चौकार आणि षटकार मारण्यास सुरुवात केली. दुबेने अवघ्या 21 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि त्याची आयपीएल कारकिर्दीतली ही 7वी अर्धशतक खेळी होती. दुबेने आपल्या स्फोटक खेळीत 2 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार ठोकले, ज्यामुळे युवराज सिंगची आठवण झाली. समीर रिझवीलाही प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली, ज्याने आयपीएल पदार्पण आणि कारकीर्दीतील पहिल्याच चेंडूवर रशीद खानला षटकार ठोकला. रिझवीच्या 6 चेंडूत 14 धावांच्या कॅमिओ खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सने 200 धावांचा टप्पा ओलांडला. चेन्नईच्या खेळाडूंच्या दमदार फलंदाजीने संघाची धावसंख्या 206 धावांवर नेली आहे.
गुजरात टायटन्सच्या अनुभवी गोलंदाजांनी चांगला मारा केला नाही. उमेश यादवने केवळ 2 षटकात 27 धावा दिल्या होत्या, त्यामुळे त्याला उर्वरित 2 षटके पूर्ण करता आली नाहीत. तर राशिद खानने निश्चितपणे 2 विकेट घेतल्या, परंतु 4 षटकात 49 धावा दिल्या. दरम्यान, अजमतुल्ला उमरझाईनेही १० च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. त्याने 3 षटकात 30 धावा दिल्या. रशीद खानच्या 2 विकेटशिवाय स्पेन्सर जॉन्सन, साई किशोर आणि मोहित शर्मा यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.