मुंबई: यजमान श्रीलंकेने टी-20 मालिकेत भारतीय क्रिकेट संघाशी सामना करण्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. श्रीलंकेच्या निवड समितीने मंगळवारी सोळा सदस्यीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये कर्णधारपद चारिथ असालंका यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. चरित असालंकाची T20 मधील कामगिरी काही विशेष झाली नाही. परंतु, असे असतानाही त्याला कर्णधार बनवण्यात आले. वास्तविक, भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी वानेंदू हसरंगाने अचानक संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यामुळेच असालंकाकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. श्रीलंकेच्या संघाने एका आर्मी मेजरचाही संघात समावेश केला आहे. श्रीलंकेच्या लष्करात मेजर पदावर कार्यरत असलेल्या दिनेश चंडिमलचा संघात समावेश करण्यात आला आहे.
T20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ
चरित असालंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नाण्डो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, दसुन शनाका, वानेंदु हसारंगा, दुनिथ वेलागे, महीश तीक्षणा, चामिंडु विक्रमासिंघे, मथीशा पथिराना, नुआन तुषारा, दुष्मंता चमीरा, बिनुरा फर्नाण्डो.
टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर, 18 जुलै रोजीच त्यांनी टी-20 आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली होती. भारताने आपल्या T20 संघासाठी नवा कर्णधारही नियुक्त केला आहे. संघाची कमान सूर्यकुमार यादव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शुभमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. रोहित शर्मा वनडे संघाची कमान सांभाळणार असून उपकर्णधार शुभमन गिल आहे.
भारताचा T20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.
भारत-श्रीलंका T20-ODI मालिकेचे वेळापत्रक
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना 27 जुलै रोजी होणार आहे. दुसरा T20 सामना 28 जुलैला आणि तिसरा T20 सामना 28 जुलैला होणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना 2 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दुसरा वनडे 4 ऑगस्टला तर तिसरा एकदिवसीय सामना 7 ऑगस्टला खेळवला जाईल.