ढाका : भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान उद्या पासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वीच बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. एका वृतापत्राने दिलेल्या माहितीनुसार शाकिबच्या खांद्याला दुखापत झाली असून आज त्याने सराव सत्रात देखील सहभाग घेतला नसल्याचे समोर आले आहे.
शाकिब अल हसन हा बांगलादेश संघाचा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली बांगलादेश संघाने नुकतीच एकदिवसीय मालिका जिंकली होती. आता मात्र शाकिबच जखमी झाला असल्याने बांगलादेश संघाचे नेतृत्व कोण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणारे आहे.
उद्यापासून (बुधवार) सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी लढतीत शाकिब खेळू शकेल की नाही याबाबत संघ व्यवस्थापन सदस्यांमध्ये चारचा सुरु असलयाचे वृत्तपत्राने म्हटले आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत उमरान मालिकचा सामना करताना शाकिबच्या खांद्याला आणि बारगडीला दुखापत झाली होती.
याबाबत डोमिंगो म्हणाले की, “आम्ही अजूनही त्याच्या दुखापतीचे मूल्यांकन करत असून शाकिबला खेळता येऊ शकेल की नाही याची खात्री करत आहोत. याबाबत आम्ही काही वेळातच निर्णय घेणार असून शाकिब अजूनही दुखापतीशी संघर्ष करत असून तो या स्पर्धेत खेळेल अशी आम्हाला आशा आहे.