Bigg Boss 18: भारतीय क्रिकेटपटू, लेग स्पिनर युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे चांगलाच चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काहीच आलेबल नाही, ते लवकरच वेगळे होणार, अशा अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. याचदरम्यान आता चहलबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. तो लवकरच ‘बिग बॉस 18’ या सलमान खानच्या रिॲलिटी शो मध्ये दिसणार आहे. नुकातच तो या शोच्या सेटवर दिसला होता, ज्याचे काही फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहे.
युझवेंद्र चहल ‘बिग बॉस 18’ च्या सेटवर कॅज्युअल लूकमध्ये दिसून आला होता. त्याच्या कारमधून उतरून तो थेट व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेला. समोर आलेल्या फोटग्राफर्सना त्याने काहीही पोझ वगैरे दिली नाही.
नंतर तयार झाल्यावर युजवेंद्र चहल आपल्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर आला. यावेळी त्याच्यासोबत श्रेयस अय्यर आणि शशांक सिंगही दिसून आले. युझवेंद्रने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि कार्गोसोबत पांढरे जॅकेट घातले होते. तो त्याच्या मित्रांसोबत पापाराझींसाठी पोज देताना दिसला.
घटस्फोटांच्या अफवांबाबत काय म्हणाला चहल ?
रिपोर्ट्सनुसार, चहल आणि धनश्री वर्मा यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्यानंतरच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. त्याचबरोबर धनश्री आणि युजवेंद्रच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या बातम्याही समोर येत आहेत. या अफवांवर या जोडप्याने कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही परंतु अलीकडेच युझवेंद्र चहलने एक पोस्ट केली होती. युझवेंद्र चहलने घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अनेक पोस्ट केल्या.
View this post on Instagram
मात्र चहलने या इंस्टा स्टोरीतून दोघांच्या नात्याबाबत इशारा दिला आहे. चहलने या स्टोरीतून स्वत:ला चांगला खेळाडू, चांगला मुलगा, चांगला भाऊ आणि चांगला मित्र असं म्हटलं. मात्र चांगला पती असा उल्लेख न केल्याने नेटकऱ्यांना प्रश्न पडला. तसेच घटस्फोटाच्या चर्चेबाबत चहलने हे खरं असू शकतं आणि नाही, असंही नमूद केलं होतं.
धनश्री काय बोलली?
यापूर्वी धनश्री वर्मानेही तिच्या इन्स्टा स्टोरीतून प्रतिक्रिया दिली होती. सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंगमुळे धनश्री वर्मा चांगलीच संतापली आहे. सोशल मीडियावरील चर्चा पाहून तिचे थेट चारित्र्य हनन झाल्याचा आरोप केला . 8 जानेवारीला धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक वक्तव्य पोस्ट केलं. धनश्रीने गेले काही दिवस कुटुंबासाठी त्रासदायक गेल्याचा उल्लेख केला त्यामध्ये केला होता. तसेच नात्याबाबत सोशल मिडिया आणि वेगवेगळ्या मिडिया रिपोर्टवर नाराजी व्यक्त केली होती. माझं मौन ही माझी कमकुवत बाजू नसून ती ताकद आहे. नकारात्मकचा ऑनलाईन सहज पसरवता येते. पण दुसऱ्यांना वर आणण्यासाठी हिम्मत आणि उदारता असावी लागते, असंही तिने लिहीलं होतं.