IND vs AUS Final: अहमदाबाद: नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 240 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 50 षटकात 241 धावा करायच्या आहेत. ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावल्या आहेत.
मोहम्मद शामीने भारताला पहिले यश मिळवून दिले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने डेव्हिड वॉर्नरला बाद केले. तीन चेंडूत सात धावा करून वॉर्नर बाद झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मिचेल मार्शला बाद केले. मार्श 15 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. विकेटकीपर केएल राहुलने त्याचा झेल घेतला. त्यानंतर बुमराहने स्टीव्ह स्मिथला सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले. नऊ चेंडूत चार धावा केल्यानंतर स्मिथ पायचीत झाला. सध्या ऑस्ट्रेलियाने नऊ षटकात तीन विकेट गमावत 51 धावा केल्या आहेत.