Parish Olympic 2024 : पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं असून देशाचं नाव उंचावलं आहे. कांस्यपदक विजेती मनू भाकर ही भारतात दाखल झाली आहे. दिल्ली विमानतळावर तिचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले आहे. मनूने ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकण्याची किमया केली आहे.
भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे. 22 वर्षीय मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपली छाप पाडली आहे.
जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.