पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा अधिकार कुणाचा हा वाद निर्माण झाला होता. हा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेला. यावर न्यायालयाने निर्णय दिला आहे.
अॅड तुषार पवार यांनी परिषदेकडून न्यायालयात बाजू मांडली होती.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेलाच राहणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता राज्य कुस्तीगीर परिषदेला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा अधिकार मिळाला आहे.
ही स्पर्धा लवकरच घोषित करण्यात येणार आहे, असे संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले. भारतीय कुस्ती संघटनेची केलेली कारवाई न्यायालयाने फेटाळली आहे.
दोन महिन्यापूर्वी भारतीय कुस्ती संघटनेने नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली होती. त्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा राज्य कुस्तीगीर परिषद घेणार होती.
याबाबत भारतीय कुस्ती संघटनेने आक्षेप घेतला होता. राज्य कुस्तीगीर संघटनेने न्यायालयात याचिका दाखल केली होती.