मुंबई – ब्राझील संघाचे महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले असल्याची माहिती पेले यांची मुलगी नॅसिमेंटो हिने इन्टाग्रामवर पोस्ट करून दिली.
मागील काही वर्षांपासून पेले कर्करोगाशी झुंजत होते, गेल्या काही दिवसात त्यांची अवस्था सातत्याने बिकट होत गेली होती. नोव्हेंबर महिन्यात पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी साओ पाऊलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यावेळी पेले यांचे सर्व कुटुंबीय रुग्णालयात पोचले होते. यावेळी त्यांच्या मुलाने पेले याचा हात धरलेला फोटो टाकताना ‘माझी ताकद तुमची आहे’ अशी कॅप्शन टाकत फोटो शेयर केला होता. त्यावेळीच त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे समोर आले होते.
‘आम्ही जे काही आहोत, त्यासाठी तुमचे आभारी आहोत. आम्ही तुझ्यावर असीम प्रेम करतो, ‘Rest in Piece’ असे कॅप्शन लिहिताना पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटोने सर्व कुटुंबियांचा हात पेले याच्या हाताजवळ असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे.
मागील वर्षीच पेले यांचा कोलन ट्यूमर काढण्यात आला होता. त्यानंतर कर्करोगाच्या उपचारासाठी पेले रुग्णालयात होते. मात्र, काही दिवसांपासून ते केमो थेरपीला देखील प्रतिसाद देत नव्हते, व आज त्यांच्या निधन झाले आहे.