IPL 2025 : आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी सर्व संघांमध्ये उलटफेर बघायला मिळत आहेत. कारण या स्पर्धेपूर्वीच मेगा ऑक्शनचा थरार रंगणार असल्यामुळे आपल्या आवडत्या संघातील खेळाडू दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या संघातील खेळाडू आपल्या आवडत्या संघातून खेळताना दिसून येऊ शकतात. दरम्यान, संघातील खेळाडूंमध्ये बदल होण्यापूर्वी कोचिंग स्टाफमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली असल्याची बघायला मिळत आहे. राजस्थान रॉयल्स संघातील दिग्गज खेळाडू आगामी आयपीएल स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्स संघातील दिग्गज खेळाडू कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात जाणार असल्याचं बोललं जात आहे. कुमार संगकाराने २०२१ पासून राजस्थान रॉयल्स संघासाठी डायरेक्टर ऑफ क्रिकेटची भूमिका बजावली आहे. मात्र आता त्यांनी या फ्रेंचायझींची साथ सोडण्याचा विचार केला असून इतर फ्रेंचायझी त्याला संपर्क करत आहे. ज्यात केकेआरचाही समावेश असल्याचं समोर येत आहे. मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. येत्या काही दिवसात, याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. जर कुमार संगकाराने केकेआरमध्ये प्रवेश केला. तर त्याला मेंटॉरची भूमिका दिली जाऊ शकते.
Kumar Sangakkara in talks to replace Gautam Gambhir at KKR for IPL 2025. (Sports Today). pic.twitter.com/p7YCcjuMXO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 5, 2024
गंभीरने सोडला केकेआर संघ..
गौतम गंभीरने आयपीएल २०२४ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मोलाची भूमिका बजावली होती. मात्र गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला केकेआरची साथ सोडावी लागली आहे. यासह अभिषेक नायरने सुद्धा केकेआरची साथ सोडली आहे.
केकेआरने आयपीएल २०२४ स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरलं होतं. फायनलमध्ये या संघाने हैदराबादला पराभूत करत आयपीएलची ट्रॉफी उंचावली होती. या विजयाचं श्रेय गौतम गंभीरला देखील दिलं गेलं होतं. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स संघात एन्ट्री करणार असल्याचं बोललं जात आहे. राहुल द्रविड यांची राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.