पुणे : भारतीय क्रिकेटपटू तसेच यष्टीरक्षक ऋषभ पंत याच्या चारचाकी गाडीला भिषण अपघात झाला आहे. यामध्ये रिषभ पंत गंभीर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड वरून दिल्लीकडे जात असताना हा अपघात झाला आहे. यामध्ये चारचाकी गाडी ही डिव्हायडरला जोरदार धडकल्याने पंतच्या डोक्याला व पायाला जोरदार जखमी झाला आहे.
रिषभ पंतला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिषभ पंतच्या कपाळावर, पायाला व पाठीला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंग या घटनास्थळी पोचल्या आहेत. प्राथमिक अपघातानंतर रिषभ पंतला प्राथमिकी उपचारासनातही रुरकी येथील सक्षम रुग्णालयात नेण्यात आले होते. येथील डॉ. सुशील नागर यांनी रिषभ पंतची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
रिषभ पंत याला रुरकीवरून डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. नागर यांनी दिली. यावेळी खानपूरचे आमदार उमेश कुमार त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.