IND vs AUS : ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरवात झाली असून पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिकेत आघाडी घेतली आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया ०-१ असे मागे पडले आहेत. ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून त्यांचा बरोबरी साधण्याचा प्रयत्न असणार आहे. पण, त्याआधीच त्यांना मोठा धक्का बसला आहे.
जलदगती गोलंदाज जोश हेझलवूड साईड स्ट्रेंन दुखापतीमुळे दिवस-रात्र कसोटीला मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या निवडकर्त्यांनी अनकॅप्ड वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश केला आहे. शॉन अॅबॉट आणि ब्रेंडन डॉगेट या दोघांनाही भारताविरुद्ध अॅडलेड येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात सामील करण्यात आले आहे. हा दिवस-रात्र सामना होणार आहे.
स्कॉट बोलंड अॅडलेडमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये येण्याची तयारी आहे, त्याने जुलै २०२३ मध्ये हेडिंग्ले येथे ऍशेस दौऱ्यात शेवटचा कसोटी सामना खेळला होता. कॅनबेराच्या मनुका ओव्हल येथे दिवस रात्र दोन दिवसीय सराव सामना होणार आहे. भारत विरुद्ध पंतप्रधान इलेव्हन सामन्यात बोलंड नेतृत्व करत आहे. पर्थ येथे सुरुवातीच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटीत पहिल्या डावात उजव्या हाताचा गोलंदाज ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज होता. त्याने पहिल्या डावात ४-२९ अशी गोलंदाजी केली होती आणि भारताचा डाव १५० धावांत आटोपला होता.